मजूर आणि बेघरांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; ४५७३ मदत केंद्रे स्थापन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना मजूर आणि बेघरांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून राज्यामध्ये एकूण ४५७३ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना मजूर आणि बेघरांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून राज्यामध्ये एकूण ४५७३ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये एकूण ५,६०,४५० स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ७,३६,९३९ मजूर आणि बेघर लोकांना जेवण पुरवण्यात आले आहे. या माहितीचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे.

दरम्यान,  महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांत आज (ता. १३) एकूण ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. आज (ता. १३) रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात ८२ नव्या करोना रुग्णांची भर पडली असून त्यापैकी एकट्या मुंबईत ५९ रुग्ण आहेत.

महाराष्ट्राचा आकडा २हजार पार; कोठे वाढले किती रुग्ण?

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government provides Establish 4573 help centers for Laborers