...अन्‌ बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

कोरोनामुळे बदलापुरात एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली होती. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात संसर्ग झाल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे पत्रकात म्हटले होते. ही माहिती समाजमाध्यमातून वाऱ्यासारखी पसरताच बदलापूरकरांची चिंता वाढली होती; मात्र "ती' महिला बदलापूरची नसल्याचे निष्पन्न झाल्यावर बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे. 

बदलापूर : कोरोनामुळे बदलापुरात एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली होती. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात संसर्ग झाल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे पत्रकात म्हटले होते. ही माहिती समाजमाध्यमातून वाऱ्यासारखी पसरताच बदलापूरकरांची चिंता वाढली होती; मात्र "ती' महिला बदलापूरची नसल्याचे निष्पन्न झाल्यावर बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे. 

उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृहाचे कोव्हिड-19 रुग्णालयात रुपांतर

सदर महिला गेल्या अनेक दिवसांपासून विविध आजाराने ग्रस्त होती. तसेच तिला पाठीच्या मणक्‍याचा त्रास होता व जखमा असल्याने तिला मुंबईतील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे कोरोनाचा संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. मात्र याबाबत सविस्तर माहिती घेतली असता सदर महिला ही मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी होती. तिला बदलापुरातील एका वृद्धाश्रमात गेल्या अनेक महिन्यांपासून दाखल करण्यात आले होते. 

कोरोनामुळे सील केलेल्या इमारतीत तो राहिला एकटाच

20 मार्चला त्यांना जास्त त्रास होत असल्याने मुलाने तिला मुंबई येथे एका खासगी रुग्णालयामध्ये नेऊन तिच्यावर उपचार केले. ज्या रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले त्या रुग्णालयामध्ये या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने तेथे तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे. 

आश्रम परिसर सील 
बदलापुरातील वृद्धाश्रम प्रशासनाला सदर महिला मृत झाल्याची माहिती समजल्यानंतर लगेचच खबरदारीचा उपाय म्हणून ही महिला राहत होती तेथे राहणाऱ्या दोन सेवकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून बदलापूर पालिकेने वृद्धाश्रमातील 66 वृद्धांची तपासणी करण्याचे ठरवले आहे. तसेच आजूबाजूचा परिसर पालिकेने सील केला असून येथे राहणाऱ्या नागरिकांचीदेखील तपासणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Badlapurukar get relief from corona suspects