Coronavirus : नायडू, ससूनला 10 स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

नायडू, ससून आणि कोरोनाची तपासणी करणाऱ्या रुग्णालयांना रावेतकर ग्रूपतर्फे 10 स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान करण्यात आले. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिकांना सुरक्षितता लाभणार आहे.

पुणे - नायडू, ससून आणि कोरोनाची तपासणी करणाऱ्या रुग्णालयांना रावेतकर ग्रूपतर्फे 10 स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान करण्यात आले. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिकांना सुरक्षितता लाभणार आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हे बूथ प्रदान करण्यात आले. ते म्हणाले, "सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था विविध माध्यमातून मदत करत असून अश्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाशी सक्षमपणे सामना करता येईल." यावेळी रावेतकर ग्रूपचे संचालक अमोल रावेतकर, क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर व महापालिकेचे उपआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी केरळ मधे सर्वप्रथम स्वॅब टेस्टींग बूथची कल्पना सोशल मीडिया वर बघितली आणि मग आपल्या पुण्यात ही हे प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले, असे रावेतकर यांनी सांगितले. या बूथ मुळे तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामधे सुरक्षित अंतर राहील व त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट परिणाम होणार नाही, यासाठी हे महत्त्वाचे ठरतील, असेही त्यांनी सांगितले.

क्रिएटिव्ह फौंडेशन दानशूर व सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि प्रशासन यांच्यामधे दुआ म्हणून काम करत असून निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले. महापालिकेच्या सर्व केंद्रात हे बूथ बसविण्यात येत आहेत. त्यामुळे पीपीई किटचा खर्च वाचेलच पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणी होवू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 swab testing booth give to naidu and sasoon hospital in pune