coronavirus: शिक्रापूर येथे गर्भवतींसह 144 जण "होम क्वारंटाइन' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

शिक्रापूर येथील रेडिओलॉजिस्टच्या लॅबमध्ये सोनोग्राफी केलेल्या गर्भवती महिलांसह 144 जणांना होम क्वारंटाइन केल्याची माहितीही डॉ. पवार यांनी दिली.

शिक्रापूर - येथील कोरोनाबाधित रेडिओलॉजिस्टशी संबंधित आठ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. दरम्यान, या रेडिओलॉजिस्टच्या लॅबमध्ये सोनोग्राफी केलेल्या गर्भवती महिलांसह 144 जणांना होम क्वारंटाइन केल्याची माहितीही डॉ. पवार यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिलांपैकी 69 जणींचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यात पाठविले आहेत. येथील रेडिओलॉजिस्टला कोरोना झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. स्थानिक पातळीवर निर्जंतुकीकरण तसेच अन्य उपाययोजनांच्या अंमलबजावणीला प्रशासनाने गती दिली. रेडिओलॉजिस्टच्या आठ सहकाऱ्यांचे सॅंपल पुण्यात तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे अहवाल आज निगेटिव्ह आले. लॅबमध्ये तपासणी केलेल्या महिला शिरुर, दौंड, आंबेगाव, खेड तालुक्‍यातील आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याचे बारीक लक्ष असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 144 home quarantine including pregnant