महापालिकेने वायसीएम व भोसरी रुग्णालयासाठी २५ आयसीयू बेड, १२ व्हेंटिलेटरची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व साहित्य व औषधे खरेदीचे अधिकारी महापालिका पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार वायसीएमसाठी १५ व भोसरी रुग्णालयासाठी १० आयसीयू बेड खरेदी केले आहेत.

पिंपरी - कोरोनाबाधितांवर उपचारासाठी महापालिकेने वायसीएम व भोसरी रुग्णालयासाठी २५ आयसीयू बेड व १२ व्हेंटिलेटरसह अन्य आवश्‍यक उपकरणे व साहित्य खरेदी केले आहे. तसेच, कंपन्यांच्या सीएसआर फंडाडून तीन व्हेंटिलेटर वायसीएमला मिळाले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व साहित्य व औषधे खरेदीचे अधिकारी महापालिका पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार वायसीएमसाठी १५ व भोसरी रुग्णालयासाठी १० आयसीयू बेड खरेदी केले आहेत. सध्या वायसीएम रुग्णालय कोरोनाबाधित व क्वारंटाइन रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे. येथील अन्य रुग्ण डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले आहेत. त्यामुळे नवीन १२ व्हेंटिलेटरही वायसीएममध्येच ठेवले आहेत. येथील नादुरुस्त जुने १७ व्हेंटिलेटर संबंधित कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठविले आहेत. तेही दोन-तीन दिवसांत येतील. नवीन खरेदीमध्ये सिरीन पंप, मल्टिपॅरा मॉनिटर अशा ३१ उपकरणांचा व साहित्याचा समावेश आहे. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सीएसआर फंडाचाही आधार 
शहर परिसरातील कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) तीन व्हेंटिलेटर आणि अत्यावश्‍यक अन्य उपकरणेही वायसीएममध्ये दाखल केले आहेत. तसेच, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरीरील जिजामाता रुग्णालय व नेत्र रुग्णालयही तयार ठेवलेले आहे. सध्या सर्व ३५ सक्रिय रुग्णांवर वायसीएममध्येच उपचार सुरू आहेत. 

अत्यावश्‍यक साहित्य खरेदी 
महापालिकेच्या भांडार विभागाने २५० बेडच्या प्रमाणात २९ प्रकारच्या औषधांसह अत्यावश्‍यक साहित्य खरेदी केली आहे. यामध्ये एन-९५ मास्क दोन हजार, साधे मास्क दोन लाख, पीपीई किट २१५, हॅन्डवॉश तीन हजार बाटल्या, सॅनिटायझर एक हजार बाटल्या यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 beds 12 ventilators buy municipal corporation