बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून ५ कोटींची मदत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

भारत सरकारने बॅंक ऑफ महाराष्ट्रला ‘पीएम केअर्स फंडा’त देणगी जमा करण्यासाठी नामांकित केले आहे. ‘पीएम केअर्स’मध्ये ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’, ‘आयएमपीएस’ अथवा ‘पीएम केअर्स फंड’ या नावे धनादेशाद्वारे आणि डिमांड ड्राफ्टद्वारे योगदान दिले जाऊ शकते. बॅंकेच्या देशभरातील सर्व ३२ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून कोरोना योद्‌ध्यांना पाठिंबा देण्यासाठी मास्क, ग्लोव्हज, कॅनोपी छत्र्या, पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे, किराणा माल आदी साहित्य वितरीत करण्याचे उपक्रम घेतले गेले आहेत.

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने ‘पीएम केअर्स फंडा’साठी ५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ‘पीएम केअर्स फंडा’साठी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी दिलेले हे योगदान कोरोनाच्या वैश्‍विक साथीच्या विरोधात लढण्यासाठी आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत सरकारने बॅंक ऑफ महाराष्ट्रला ‘पीएम केअर्स फंडा’त देणगी जमा करण्यासाठी नामांकित केले आहे. ‘पीएम केअर्स’मध्ये ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’, ‘आयएमपीएस’ अथवा ‘पीएम केअर्स फंड’ या नावे धनादेशाद्वारे आणि डिमांड ड्राफ्टद्वारे योगदान दिले जाऊ शकते. बॅंकेच्या देशभरातील सर्व ३२ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून कोरोना योद्‌ध्यांना पाठिंबा देण्यासाठी मास्क, ग्लोव्हज, कॅनोपी छत्र्या, पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे, किराणा माल आदी साहित्य वितरीत करण्याचे उपक्रम घेतले गेले आहेत. 

कोरोना संकटाच्या काळात बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या १ हजार ८०० पेक्षा अधिक शाखा तसेच, १ हजार ८५० एटीएमच्या माध्यमातून अखंडित वित्तीय सेवा पुरवण्यात येत आहे. तसेच, बॅंकिंग प्रतिनिधी देशामध्ये ३ हजारहून अधिक ठिकाणी वित्तीय सेवा पुरवत आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत व्यवहारासाठी ग्राहक शाखेमध्ये आल्यास त्यांना सॅनिटायझर देणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या उपाययोजना करत बॅंकिंग सेवा सुरू आहे, असे बॅंकेकडून कळविण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 crores from Bank of Maharashtra for pm cares fund