esakal | #Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri-Chinchwad-Seal

खराळवाडीत प्रवेश नाहीच
पुणे-मुंबई महामार्ग व पिंपरी-भोसरी मार्गावरील खराळवाडीत जाण्यासाठीचे चारही रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. यात महामार्गावरील पीएमपी बस थांबा, भक्ती कॉम्प्लेक्‍स, महात्मा फुले स्मारक, पोदार स्कूल, चांदणी चौक येथून जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे.

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारा गावांचा भाग यापूर्वीच ‘लॉक’; चार रस्ते, पुलांवरील रहदारी रोखली 
पिंपरी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी रुग्ण आढळलेले शहरातील भाग व रस्ते बंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील १२ गावांचा भाग यापूर्वीच सील केला आहे. त्यात शनिवारपासून (ता. १८) चार रस्ते आणि चार पूल रहदारीसाठी बंद केले आहेत. अशा पद्धतीने सुमारे निम्मे शहर सीलबंद झाले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशी आहे वस्तूस्थिती

  • दापोडी-बोपोडी मुळा नदीवरील पूल : पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीवरील गाव म्हणजे दापोडी. हा भाग सील केलेला असूनही नागरिकांची ये-जा सुरूच होती. परिणामी शुक्रवारी मध्यरात्रीपासून रहदारीसाठी पूल बंद करण्यात आला. या पुलावरून खडकी बाजार, रेल्वे स्टेशन, औंध व पुण्यात जाणे सोयीचे होते. 
  • दापोडी-सांगवी पवना नदीवरील पूल : जुनी व नवी सांगवी, औंध गाव, बाणेर, औंध जिल्हा रुग्णालय, लष्कराचा औंध कॅम्प, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडीकडे जाण्यासाठी पुलाचा वापर केला जातो. दापोडी रेल्वे स्टेशन, सीएमई, खडकी बाजारसह पुणे-मुंबई महामार्गाने जाण्यासाठी सांगवीकरांना पूल सोयीचा आहे. 
  • दापोडी-पिंपळे गुरव पवना नदीवरील पूल : नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील नागरिकांना पुणे, खडकी बाजार व रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी पुलाचा उपयोग होतो. तर या पुलावरून दापोडीकरांना पिंपळे सौदागर, नवी सांगवीत जाणे सोयीचे आहे. आता नाशिक फाटा मार्गे म्हणजे पाच किलोमीटर वळसा घालून जावे लागतंय.

हे रस्ते बंद

  • बोपोडीतील भाऊ पाटील रोड ते दापोडीतील शिवाजी महाराज पुतळा रस्ता
  • भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते स्मशानभूमी रस्ता
  • नेहरूनगर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाजवळील गोकूळ हॉटेल ते गवळी माथा रस्ता
  • भोसरीतील गव्हाणे पेट्रोल पंप ते दिघी रस्त्यावरील सिद्धेश्‍वर स्कूल रस्ता 
loading image