coronavirus:आळंदी आज, उद्या बंद 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी(ता. १३)आणि मंगळवारी(ता. १४)आळंदी शहर संपूर्णपणे बंद ठेवणार असल्याची माहिती आळंदी पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

आळंदी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी (ता. १३) आणि मंगळवारी (ता. १४)आळंदी शहर संपूर्णपणे बंद ठेवणार असल्याची माहिती आळंदी पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संचारबंदी काळात आळंदीत किराणा दुकान आणि भाजी विक्रेत्यांना व्यवसायासाठी सकाळपासून दुपार एकपर्यंत परवानगी दिली होती. मात्र, अनावश्यक आणि बिनकामाचे फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्णय घेतला. यामुळे उद्यापासून दोन दिवसांसाठी आळंदी शहरातील सर्व व्यवहार थांबविण्यात आले असून तशी पूर्वसूचना नागरिकांनाही दिली आहे. यामधे मेडिकल दुकाने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना बंदमधून वगळण्यात आले आहे. बंद काळात अनावश्यक कामासाठी फिरणाऱ्यांर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर बंदबाबतची पूर्वकल्पना व्यापाऱ्यांही दिली आहे. दिघी आणि भोसरी भागातही संपूर्ण बंद पाळण्यात आला आहे. यामुळे लगतची गावे बंद ठेवल्याने आणि कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होण्यासाठी आळंदीतही दोन दिवसांसाठी बंद ठेवल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alandi close today and tomorrow to prevent Corona outbreak