#Lockdown2.0 : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने गोरगरीब नागरिकांना दररोज जेवणाचे डबे वाटप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या व उपासमारीची वेळ आलेल्या शहरातील गोरगरीब नागरिकांना वडगाव नगरपंचायतीच्या वतीने येत्या ३ तारखेपर्यंत दररोज सकाळी व संध्याकाळी जेवणाचे डबे वाटप करण्यात येणार आहे.

वडगाव मावळ - लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या व उपासमारीची वेळ आलेल्या शहरातील गोरगरीब नागरिकांना वडगाव नगरपंचायतीच्या वतीने येत्या ३ तारखेपर्यंत दररोज सकाळी व संध्याकाळी जेवणाचे डबे वाटप करण्यात येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगरपंचायतीच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील गरजू नागरिकांना दररोज जेवणाचे दोन हजार डबे पुरविण्यात येणार आहे.  या उपक्रमाचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव  वायकर, माजी उपसभापती गणेश ढोरे, भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, अशोक बाफना, चंदुकाका ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनराध्यक्षा माया चव्हाण, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, विजय जाधव, पूनम जाधव, पूजा वहिले,प्रमिला बाफना,शरद ढोरे,प्रविण ढोरे, गणेश पं ढोरे, सोमनाथ धोंगडे आदी उपस्थित होते.

मोरया ढोल पथकाचे सभासद जेवणाचे डबे भरण्यासाठी वडगाव नगरपंचायतीस सहकार्य करणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात येथील स्व.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने गरजू नागरिकांना जेवणाचे पाच हजार डबे पुरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक पंढरीनाथ ढोरे, अध्यक्ष सुनील शिंदे, अरुण वाघमारे, अतुल राऊत, सुनिल शिंदे, सोमनाथ धोंगडे, शेखर वाघमारे, मंगेश तुमकर आदींनी सहभाग घेतला.

लायन्स क्लब ऑफ वडगावच्या वतीनेही गरजूंना भोजन डबे पुरवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला मावळ फेस्टीवल संस्थेच्या वतीने २५ हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले.

क्लबचे संस्थापक अॅड. दामोदर भंडारी, अध्यक्ष सुनीत कदम, सचिव जितेंद्र रावल , संचालक झुंबरलाल कर्णावट,भूषण मुथा आदींनी सहभाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allot daily lunch boxes to poor people on behalf of Wadgaon Municipal Corporation