
नारायणगाव - कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी शेतकरी असलेल्या चुलतीने अपघाती निधन झालेल्या पुतण्याच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकावन्न हजार रुपयांची मदत केली आहे. मदतीची रक्कम येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग करण्यात आली.अशी माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सुभाष डोके यांनी दिली.
येथील फुलांचे व्यापारी किशोर लक्ष्मण वाजगे(वय ४६) यांचे नुकतेच येथील पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले. या दुःखद घटनेतून सावरत कोरोना ग्रस्ताच्या मदतीसाठी वाजगे कुटूंबियांनी पुढाकार घेतला आहे. किशोर वाजगे यांच्या चुलती निलीमा राजेंद्र वाजगे या प्रगतशील द्राक्ष व भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत.या वर्षी शेती व्यवसाय अडचणीत असताना आपण समाजासचे देणे लागतो या उद्देशाने पुतणे किशोर वाजगे यांच्या स्मरणार्थ नीलिमा वाजगे यांनी ही मदत केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.