आयुष डॉक्टरांना कोविड 19 चे ऑनलाईन प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

जुन्नर तालुक्यातील ९० टक्के आयुष डॉक्टरांनी कोविड १९ बाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेतले असल्याचे जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शशांक फापाळे यांनी सांगितले.

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील ९० टक्के आयुष डॉक्टरांनी कोविड १९ बाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेतले असल्याचे जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शशांक फापाळे यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी (आयुष) डॉक्टरांना कोविड १९ या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात असून त्यास आयुष डॉक्टरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनतर्फे आयुष डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील बहुतेक डॉक्टरांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र मिळाले आहे. राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता आयुष डॉक्टरांची मदत भासू शकते. हे लक्षात घेऊन राज्यभरातील आयुष डॉक्टर हे ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कोरोना विषाणूचा  प्रसार कसा होतो, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना काय ? क्वारंटाइन आणि आयसोलेशन याच्यात काय फरक आहे ? गरम पाण्यात विषाणू मरतो का? कोणत्या रूग्णांना या आजाराचा जास्त धोका संभवतो ? आदी वीस गुणांची परीक्षा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayush Doctor getting Online Training About Coronavirus