#Lockdown2.0 : पिंपरी चिंचवड शहरात 11 ठिकाणी नाकाबंदी; सीमेवरील चार पूल कायमस्वरूपी बंद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहराच्या सीमेवर 11 ठिकाणी रविवारी मध्यरात्री पासून नाकाबंदी पाॅईंट सुरू केलेत. तर, चार पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आले. नाकाबंदी साठी 20 अधिकारी व 100 कर्मचारी नियुक्त केले आहेत. 27 एप्रिल पर्यंत नाकाबंदी आदेश लागू राहणार आहे.

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहराच्या सीमेवर 11 ठिकाणी रविवारी मध्यरात्री पासून नाकाबंदी पाॅईंट सुरू केलेत. तर, चार पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आले. नाकाबंदी साठी 20 अधिकारी व 100 कर्मचारी नियुक्त केले आहेत. 27 एप्रिल पर्यंत नाकाबंदी आदेश लागू राहणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाकाबंदी पाॅईंट
खंडोबा मंदिर बावधन, इंडियन आॅईल जंक्शन, भूमकर चौक वाकड, ताथवडे भुयारी मार्ग, पुनावळे भुयारी मार्ग, मोशी चिंबळी पूल, दापोडी-बोपोडी भाऊ पाटील रस्ता पूल, च-होली-निरगुडी रस्ता, च-होली-धानोरे रस्ता, देहू फाटा आळंदी, कॅन्बे चौक देहूरोड. 

कायमस्वरूपी बंद पूल
ज्ञानेश्वरी मंदिर पूल व चाकण चौक नवा पूल आळंदी, पुणे नाशिक महामार्गावरील मोशीतील जुना पुल, शनी मंदीर अक्षरा शाळेजवळील पूल व रस्ता पुनावळे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blockade in 11 places in Pimpri Chinchwad city