Coronavirus : ...म्हणून त्यांनी वासराचे नाव ठेवले कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

वडगाव मावळ येथील प्रगतशील शेतकरी तुषार वहिले यांच्या गोठ्यातील कपिला गायीने नुकताच एका खिलार वासराला जन्म दिला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या वासराचे कोरोना असे नामकरण केले आहे.

वडगाव मावळ - येथील प्रगतशील शेतकरी तुषार वहिले यांच्या गोठ्यातील कपिला गायीने नुकताच  एका खिलार वासराला जन्म दिला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या वासराचे कोरोना असे नामकरण केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे व आपल्या देशात सुद्धा या कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलीस ,डॉक्टर,आरोग्य सेवक असे अनेक जण या लढ्यात योगदान देत आहेत.

त्यात जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुद्धा कसा मागे राहील?सगळ्या कंपन्या बंद असताना फक्त शेतकरीच आपली शेती पिकवून  नागरिकांना अन्न धान्ये, पाले व फळ भाज्या  यांचा पुरवठा करीत आहे. गाय, बैल,शेळ्या आदी पाळीव जनावरांचे शेतकऱ्यांशी अतूट नाते आहे .येथील प्रगतशील शेतकरी तुषार वहिले यांच्याकडे दोन देशी गायी आहेत.

त्यापैकी कपिला जातीच्या गायीला नुकतेच एक खिलार वासरू झाले त्याचे नाव त्यांनी कोरोना असे ठेवले. संपूर्ण देश एकीने या कोरोनाचा सामना करत आहे. नागरिक घरी बसून लढा देत आहेत. या कोरोना मुळे अनेक कुटुंब एकत्र आले. अनेक शेजारी एकत्र आले.

पोलीस व डॉक्टर यांचे महत्व जगाला खऱ्या अर्थाने समजले. या कोरोना मुळे अनेक जण दगावले. लवकरच कोरोनावर मात होईल अशी अपेक्षा आहे. मात्र या सर्व चांगल्या वाईट गोष्टींची आठवण रहावी म्हणून या वासराचे नाव कोरोना असे ठेवले असल्याचे वहिले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The calf was named Corona