Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याचे आवाहन! कोठे ते पहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगवी पिंपळे गुरव परिसरात आत्ताच्या लाँक डाऊन परिस्थिती पोलिसांकडून नागरिकांना वेगवेगळ्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. बऱ्याचदा संध्याकाळी एकदमच लोक रस्त्यावर भाजी वा किराणा घेण्यास गर्दी करत असल्यामुळे पोलिसांकडून असे आवाहन करण्यात आले आहे.

नवी सांगवी - सांगवी पिंपळे गुरव परिसरात आत्ताच्या लाँक डाऊन परिस्थिती पोलिसांकडून नागरिकांना वेगवेगळ्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. बऱ्याचदा संध्याकाळी एकदमच लोक रस्त्यावर भाजी वा किराणा घेण्यास गर्दी करत असल्यामुळे पोलिसांकडून असे आवाहन करण्यात आले आहे. पिंंपळे गुरव येथील नावेचा रस्ता व साठ फुटी रस्त्याला नाहक लोक गर्दी करत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गॅस गोडाउन मध्ये व घरपोच सिलेंडर पोहचविणारी मुले गावी निघून गेल्यामुळे घरपोच डिलिव्हरी करण्यात अडचण येत असल्याचे कांकरीया गँस एजन्सीच्या संचालिका संगिता कांकरिया यांनी सांगितले. त्यामुळे स्वतः नागरिक गोडावून मधून सिलेंडर घेऊन जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A call to exit for the purchase of essential goods

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: