Corona Virus : व्हॉट्सअॅप वरुन पोलिसांशी संवाद: नागरिकांना मिळतोय दिलासा !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शहरामध्ये संचारबंदी लागू असताना नागरीकांना विविध प्रकारच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे. अशा विविध प्रश्न, शंका,अडचणी असणाऱ्या व अत्यावश्यक कारणासाठी सुट हवी असणाऱ्या नागरीकासाठी पुणे पोलिसांनी व्हॉट्सअप क्रमांक दिले होते. त्यानुसार संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 17 हजार 479 नागरीकांनी पोलिसांना मदतीसाठी संदेश पाठविले, त्यापैकी 7 हजार 615 तातडीचे संदेश दखल घेऊन सोडवणुक केली. तर बुधवारी 5 हजार 683 संदेशांना पोलिसांनी उत्तर देत नागरीकांना दिलासा दिला.

पुणे : कामानिमित्त आई-वडीलांपासून दूर राहणाऱ्या एक तरुणीला ती राहत असलेल्या ठिकाणी अस्वस्थ वाटु लागले, शहरात संचारबंदी लागु असल्यामुळे तिला दूसरीकडे जाता येत नव्हते, अखेर तिच्या वडीलांनी पुणे पोलिसांच्या व्हॉट्सअपवर संपर्क केला आणि पोलिसांच्या मदतीने तरुणी दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेली. या आणि अशा पद्धतीने आत्तापर्यंत 17 हजार 479 जणांना पोलिसांनी मदतीचा हात दिला.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरामध्ये संचारबंदी लागू असताना नागरीकांना विविध प्रकारच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे. अशा विविध प्रश्न, शंका,अडचणी असणाऱ्या व अत्यावश्यक कारणासाठी सुट हवी असणाऱ्या नागरीकासाठी पुणे पोलिसांनी व्हॉट्सअप क्रमांक दिले होते. त्यानुसार संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 17 हजार 479 नागरिकांनी पोलिसांना मदतीसाठी संदेश पाठविले, त्यापैकी 7 हजार 615 तातडीचे संदेश दखल घेऊन सोडवणुक केली. तर बुधवारी 5 हजार 683 संदेशांना पोलिसांनी उत्तर देत नागरीकांना दिलासा दिला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पोलिसांना प्राप्त झालेल्या संदेशांपैकी 50 टक्के संदेश हे वैद्यकीय कारणासाठी होते. तर 20 टक्के संदेश रुग्णलयाबाबत, 5 टक्के विद्यार्थी व 5 टक्के वयोवृद्ध नागरीकांशी संबंधित होते.

या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवा तुमच्या शंका, प्रश्न व अडचणी

9145003100
8975283100
9169003100
8975953100

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens get comfort in communication with police by whatsapp in Curfew

टॅग्स
टॉपिकस