Coronavirus : पुण्यातील बंद हॉस्पिटल सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांवरील उपचारासाठी महापालिकेच्या असलेल्या हॉस्पिटलच्या इमारतींचाही वापर केला जाणार आहे. त्यानुसार विविध भागांतील पाच इमारतींमधील जागेत खाटांची सोय करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने सांगितले. या ठिकाणी अडीचशे जणांची सोय होणार आहे.

पुणे - कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांवरील उपचारासाठी महापालिकेच्या असलेल्या हॉस्पिटलच्या इमारतींचाही वापर केला जाणार आहे. त्यानुसार विविध भागांतील पाच इमारतींमधील जागेत खाटांची सोय करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने सांगितले. या ठिकाणी अडीचशे जणांची सोय होणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, हा आकडा आता अडीचशे इतका आहे. त्याशिवाय, संशयितांचेही प्रमाण वाढले आहे. त्याच डॉ. नायडूसह बोपोडीतील खेडेकर आणि लायगुडे हॉस्पिमधील क्षमता सपंली असून, या तिन्ही हॉस्पिटलमध्ये साधारपणे 300 लोक आहेत. त्यातील काही संशयितही आहेत. त्याचवेळी रोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून पुरेशा खाटांची सोय करण्यात येत आहे. काही खासगी हॉस्पिटलमधील जागा आरक्षित करतानाच महापालिकेच्या मिळकतींमध्येही आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यातर्गंत हॉस्पिटलसाठी बांधलेल्या मात्र गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या इमारतीमध्ये आवश्‍यक त्या सुविधा निर्माण करून त्या ठिकाणी अडीचशे जणांची व्यवस्था करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनाने सांगितले. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed hospital to start in Pune