कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय 

कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय 

कोरोनावर विजय मिळविण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य राखण्याच्या पद्धतींचे काटेकोर पालन करावे.ज्या भागामध्ये नागरिकांची जास्त घनता आहे तेथे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तेथे स्वच्छतेबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्‍यक आहे.त्याचप्रमाणे विविध उपयायोजनांव्दारे नागरिकांना आपल्या सवयी बदलाव्या लावणे गरजेचे आहे. थंडी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच अंगणवाडी किंवा इतर आघाडीच्या कार्यकर्त्यांना माहिती द्यावी. 

1) सर्वांसाठी मास्क 
तीन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लहान मुलांसह सर्वांनीच पूर्णवेळ मास्क वापरणे गरजेचे आहे. सर्वांना शंभर टक्के सुती पुनर्वापराचा मास्क तयार कसा करावा व कसा वापरावा याची माहिती आहे याबाबत खात्री करून घ्यावी. त्याशिवाय व्यक्तींनी एकमेकांपासून अंतर राखावे.घरांच्या खिडक्‍या उघड्या ठेवून आणि पंखे लावून हवा खेळती राहील याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

2) हात धुणे 
हात धुण्यासाठी पायाने संचलित केलेली केंद्रे सार्वजनिक ठिकाणी स्थापन करावीत.त्यामुळे रहिवाशांना वारंवार हात धुता येतील.सॅनिटायझरने किमान 20 ते 60 सेकंद हात धुणे गरजेचे आहे. 

3) स्वच्छतागृहाचा वापर 
कुठल्याही व्यक्तीने उघड्यावर मलविसर्जन करू नये.प्रत्येकाने स्वच्छतागृहाचा वापर करावा.वापरानंतर स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणे. सार्वजनिक ठिकाणी आणि स्वच्छतागृहांच्या ठिकाणी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.त्याशिवाय स्वच्छतागृहात थुंकू नये आणि नाक, कान, डोळे आणि तोंडाला हात लावू नये.स्वच्छतागृहाच्या वापरानंतर हात स्वच्छ धुवावेत. 

4) जंतुनाशके 
दिवसातून तीन वेळा क्‍लोरिन मिश्रित जंतुनाशके वापरून फरशी पुसणे,रस्त्यांवर फवारणी करणे, स्वच्छतागृहे आणि भिंती स्वच्छ ठेवाव्यात.बाजारातील फिनाईल, क्‍लोरिन ब्लीच,लायसॉल पाण्यात मिसळून ते फरशी,खुर्चा,टेबल, दाराच्या कड्या, दिव्याची बटणे पुसण्यासाठी वापर करावा. 

5) आरोग्य सेतू ऍप 
आरोग्य सेतू ऍपव्दारे तुमच्या आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण असल्यास तुम्हाला सावध करेल. तुम्हाला असलेल्या निदानाचे आणि तुम्हाला वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल. या ऍपच्या माध्यमातून स्व तपासणी करू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com