Coronavirus : कर्तव्यावर असतानाच पोलिस देतायेत गरजूंना जेवणाचा डबा

Corona virus police Provides lunch box for the needy people in Pune
Corona virus police Provides lunch box for the needy people in Pune
Updated on

नवी सांगवी (पुणे) : लॉकडाऊन मध्ये दिवसरात्र कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत असताना आपल्या कार्यक्षमतेच्या पुढे जाऊन काम करणाऱ्या सांगवी पोलिसांचे येथील सर्व थरातून कौतुक होत आहे. एका बाजुला विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रहार करून वठणीवर आणले जात आहे. तर तेच दंडुके मारणारे हात एक वेळचे जेवण महाग असणाऱ्या गरीब मोलमजुरांना स्वतःच्या खिशात हात घालून जेवन खाऊ घालत आहेत. त्यामुळे एकीकडे कर्तव्य भावनेतून कायद्याचे रक्षण तर दुसऱ्या बाजुला पोलिसातला माणूस वंचितांना आपल्या ताटातला घास त्यांच्या मुखात भरवून आभाळमाया करीत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख व वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे व त्यांचे सहकारी रोहिदास बोऱ्हाडे, श्रीकृष्ण बनसोडे, गिरिष राऊत सध्या दुहेरी भूमिका बजावीत आहेत. कृष्णा चौक, काटेपुरम चौक व इतर ठिकाणी भाजी व इतर कारणांसाठी गर्दी करणाऱ्यांना समज देणे, दुचाकी, चारचाकीमधून निष्कारण फिरून लॉकडाऊचे नियम मोडणाऱ्यांना प्रसंगी आपल्या काठ्यांचा प्रसाद देणे. अशी कामेकरीत असताना रस्त्यात दिसणारे भिकारी, पीडब्ल्यडी मैदान, पाटबंधारे खात्याच्या जमीनीवर मजुरांची पालातील भुकेल्यांना स्वतः व इतर सहकाऱ्यांकडून जेवण व किराणा सामान पोहच करून मर्यादेच्या पलिकडे जाऊन काम करीत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण कृतीतून दाखवून दिले आहे.

धक्कादायक ! दारुच्या तुटवड्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख ज्ञानेश्वर साबळे म्हणाले, " सिध्दीपार्क सोसायटीतील नागरिकांच्या सहकार्याने कष्टकरी वंचित मजुरांना आंम्ही किराणा व भाजीपाला देत आहोत. काही स्वयंसेवी संस्थाही आंम्हाला सहकार्य करीत असून घरी एकटे रहणारे जेष्ठनागरिक यांनाही जेवणाच्या डब्याची सोय आमचे पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com