पुण्यात भीती वाढली : एकाच दिवसात 44 नवे रुग्ण; सहा गंभीर 

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

मंगळवारी ४४ दिवसभरात आणखी रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज ३० हून अधिक रुग्ण सापडत आहेत.

पुणे Coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या २७ वर्षांच्या तरुणासह तीन महिलांचा मंगळवारी पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील कोरोनाच्या मृतांचा आकडा ३५ झाला आहे. तर, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या ससूनमधील तीन परिचारिकांसह ४४ नवे सापडले आहेत. तयामुळे एकूण रुग्ण ३२२ पर्यंत गेली आहे. दरम्यान, एका दिवसांत पहिल्यांदाच सर्वाधिक ४४ रुग्ण सापडल्याने लोकांत पुन्हा भीती वाढली आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध रूग्णालयांतील सहा रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. तर एक कोरोनाबाधित बरा झाल्याने त्याला घरी सोडले असून, आतापर्यंत २८ जण बरे झाले आहेत. पुण्यात शहरातील काही पेठा आणि उपनगरांतील काही परिसरांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मंगळवारी ४४ दिवसभरात आणखी रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज ३० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. आता हा आकडा ४० च्या पुढे गेला आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, सर्वाधिक रुग्ण सापडल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीसाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा नेमन कोरोनाला रोखण्याच्या उपाययोजना वाढत आहोत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्याचवेळी ज्या भागांत संसर्ग वाढत आहे, त्यांच्या आजुबाजुचेही परिसरात सील करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus 44 new patients pune 6 are serious