Coronavirus : पिंपरीतील ५२९ पैकी ५०९ नमुने निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

दृष्टिक्षेपात
एकूण नमुने : ५६१
निगेटिव्ह : ५०९
प्रलंबित : ३२
पाॅझिटीव्ह : २०
घरी सोडले : १२
उपचार सुरू : ८
होम क्वारनटाइन : १८४६
सर्वेक्षण : ७,१२,९०२

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंगळवारपर्यंत (ता. ७) शहरातील ५२९ जणांच्या घशातील द्रवांचे नमुने घेऊन एनआयव्हीकडे तपासण्यात आले. त्यातील ५०९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, मंगळवारी ३३ जणांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांचे अहवाल सायंकाळपर्यंत आलेले नव्हते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात एकूण २० जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले असून उपचारानंतर बरे झालेल्या १२ जणांना घरी सोडले आहे. सध्या आठ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच, मंगळवारी नमुने घेतलेल्या ३२ जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आजपर्यंत सात लाख १२ हजार ९०२ नागरिकांना तपासण्यात आले आहे. एक हजार ८६४ जणांना होम क्वारनटाइनची सूचना प्रशासनाने दिली आहे.

आठ जणांची प्रकृती स्थिर
दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाला  पिंपरी-चिंचवडमधील 23 नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्यातील तिघांसह संपर्कात आलेल्या पाच जणांना संसर्ग झाला आहे. अशा आठ जणांवर वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus 529 out of 509 samples in Pimpri were negative