चीनमध्ये नवे कोरोना रुग्ण येतायत कुठून?

टीम ई-सकाळ
Saturday, 18 April 2020

वुहानमध्ये नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य आयोगाने नवीन आकडे जारी केले.

बीजिंग Coronavirus : चीनमध्ये बाहेरुन आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५६६ वर पोचली असून, सुधारित आकडेवारीनुसार मृतांची संख्या ४ हजार ६३२ वर पोचली आहे. एकूण मृतांपैकी ५० टक्के मृत हे वुहान शहरातील असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गावरुन कोणतिही माहिती जगापासून दडवून ठेवली नसल्याचा चीनने दावा करत आरोप फेटाळले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकही मृत्यू नाही
वुहानमध्ये नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य आयोगाने नवीन आकडे जारी केले. चीनमध्ये आतापर्यंत शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२,७१९ होती. त्यापैकी ४,६३२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १०५८ जणांवर उपचार सुरू असून ७७,०२९ जणांना घरी सोडले आहे. वुहान येथे १६ एप्रिलपर्यंत कोरोना संसर्गाचे ३२५ नवीन प्रकरणे आले असून मृतांची सख्येत १२९० ने वाढ झाल्याने एकूण संख्या ३८९६ झाली आहे. परंतु काल शुक्रवारी चीनमध्ये एकही मृत्यू झाला नाही. अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशांकडून चीनवर कोरोनाची वास्तव माहिती दडवल्याचा आरोप केला जात आहे. चीनची आकडेवारी बनावट असल्याचे सांगितले जात आहे. परंतु कोरोनाबाबत कोणतिही गोष्ट जगापासून लपवली नसल्याचा दावा चीनने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीझियान यांनी म्हटले की, चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्याने गणनेत उणिवा राहिल्या. त्यामुळे सुधारित गणनेत मृतांची संख्या वाढवावी लागली. चीनने जगापासून काहीही दडवलेले नाही. तसेच माहिती लपवून ठेवण्यासही परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा - दीड लाख ऊस तोडणी कामगार पोहोचणार घरी

चीनमध्ये २७ नवीन रुग्ण 
गेल्या चोवीस तासात २७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १७ जण बाहेरचे तर दहा रुग्ण स्थानिक असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. यापैकी सात जण रशियाच्या सीमेलगत असलेल्या हीलांगजियांग प्रांतातील आहेत. याठिकाणी रशियातील विविध शहरातील अनेक चीनी नागरिक परतल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अन्य दोन प्रकरणे गुआंगदॉंग प्रांतात तर अन्य एक रुग्ण सिचुआन प्रांतातील आहे. चीनमध्ये दिवसभरात एकाचाही मृत्यू झालेला नाही. चीनमध्ये बाहेरुन आलेल्या बाधित नागरिकांची संख्या १५६६ वर पोचली आहे. एवढेच नाहीतर ५४ रुग्णांत कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. त्यातील तीन नागरिक परदेशातून आलेले आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या हजारावर पोचली आहे. दरम्यान, हॉंगकॉंगमध्ये शुक्रवारपर्यंत १०२१ बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. मकाऊ येथे ४५ रुग्ण आहेत तर तैवान येथे सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china new cases identified foreign returns