Coronavirus : राज्यात वाढतीये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या; एकट्या पुण्यात...

वृत्तसंस्था
रविवार, 22 मार्च 2020

मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू

- पुण्यातही रुग्णांची संख्या वाढतीये

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीन, इटली, अमेरिकेसह भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भारतात आत्तापर्यंत 300 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. सध्या 11 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता हा आकडा 63 वरून 74 वर गेला आहे. 

मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू

कोरोना व्हायरसने मुंबईत यापूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईतील एका 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 6 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 

पुण्यातही रुग्णांची संख्या वाढतीये

मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता पुण्यात आणखी चार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus infected peoples number increasing in Maharashtra