esakal | Coronavirus : आज दिवसभरात पाच पॉझिटीव्ह; पिंपरी-चिंचवडचा आकडा 57
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Danger

पिंपरी शहरातील च-होली परिसरात राहणाऱ्या पोलिसासह एका महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ आणखी तिघांचे रिपोर्ट सायंकाळी पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 57 झाली आहे.

Coronavirus : आज दिवसभरात पाच पॉझिटीव्ह; पिंपरी-चिंचवडचा आकडा 57

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील च-होली परिसरात राहणाऱ्या पोलिसासह एका महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ आणखी तिघांचे रिपोर्ट सायंकाळी पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 57 झाली आहे. दरम्यान, आज दोघांचे चौदा दिवसांच्या उपचारानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. एकूण 15 जण उपचारानंतर बरे होऊन घरी पोचले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये एका पोलिसाचा व महिलेचा समावेश आहे. तर, एक जण परभणीत गेला आहे. तिथे त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. सध्या वायसीएम रुग्णालयात 34 जणांवर उपचार सुरू आहेत. सहा जण पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

loading image
go to top