Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने संसर्गाची पन्नाशी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

पिंपरी शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी (ता. 16) रात्री एक महिला पाॅझिटिव्ह आला होता. शुक्रवार सकाळ पर्यंत आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 52 वर झाली आहे. आतापर्यंत 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या 52
पिंपरी - शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी (ता. 16) रात्री एक महिला पाॅझिटिव्ह आला होता. शुक्रवार सकाळ पर्यंत आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 52 वर झाली आहे. आतापर्यंत 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, 99 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने गुरुवारी तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा आले आहेत.  त्यात एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील असून तरुण आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus patient half century cross in pimpri chinchwad city