पिंपरीतील सांगवी, दापोडी परिसराची महत्त्वाची माहिती; रस्ते झाले बंद

टीम ई-सकाळ
Saturday, 18 April 2020

काही दिवसांपूर्वीपर्यंत दापोडी भाग सिल असूनही नागरीकांचा या दोन्ही रस्त्यावरून वावर सुरू होता.

जुनी सांगवी - पुणे - Coronavirus : दापोडी-सांगवी, पिंपळे गुरव-दापोडी हा पवना नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, कोरोनोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. सांगवी-दापोडीला जोडणा-या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर प्रशासनाकडून बॅरेकेट लावून संचारबंदीचा फलक लावण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काही दिवसांपूर्वीपर्यंत दापोडी भाग सिल असूनही नागरीकांचा या दोन्ही रस्त्यावरून वावर सुरू होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी पुण्याकडे रहदारीसाठी आता पुणे मुंबई मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. भाजी व अन्य किराणा खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. येथील रेल्वेगेट भाजी मार्केटमधे अजूनही नागरिकांकडून भाजी खरेदीसाठी गर्दी होत आहे. तर अंतर्गत गल्ल्यांमधून येथील बॉम्बे कॉलनी, वरची आळी, भिकनशेठ पार्क महादेव आळी, अशा गल्ल्यांमधून फेरीवाल्या भाजी विक्रेत्यांकडून भाजी विक्री होत असल्याचे येथील नागरीक सांगतात. संचारबंदी व भाग सील करूनही संचारबंदीची पायमल्ली करत अंतर्गत भागात मोकाट फिरणाऱ्यांचा वावर  सुरूच असल्याचे एका नागरिकाने सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pimpri dapodi sangvi pimple gurav roads closed