पुणेकरांनो रक्तदान करायचंय? कॉल करून आधी नोंदणी करा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावला रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक रक्तदान शिबिरेही रद्द झाली आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुणेकर रक्तदानासाठी पुढे येत असून 15 दिवसांमध्ये सुमारे एक हजार 200 नागरिकांनी रक्तदान केले आहे.

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भावला रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक रक्तदान शिबिरेही रद्द झाली आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुणेकर रक्तदानासाठी पुढे येत असून 15 दिवसांमध्ये सुमारे एक हजार 200 नागरिकांनी रक्तदान केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलनासाठी राबविण्यात येत असलेल्या अभियाना अंतर्गत 15 ते 31 मार्च दरम्यान रक्तपेढीमध्ये सुमारे दिड हजार रक्ताच्या पिशव्यांचा साठा झाला असून दररोज गरजेप्रमाणे 25 ते 50 नागरिक रक्तदान करत आहेत. लॉकडाऊनचा काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. मात्र रक्तदानासाठी बाहेर पडणार्यांजना रक्तपेढीमार्फत आधीच पत्र देण्यात आले आहे. या पत्रासाठी रक्तदात्यांनी पूर्वीच नोंद केली होती. त्यामुळे, पोलिस प्रशासन या रक्तदात्यांना अडवत नाही. अशी माहिती जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिली. रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी 7350002460, 9423066622 या क्रमांकावर संपर्क साधून पूर्व नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे.

रक्त पेढीत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असून काळजी करू नये. रक्तदान केल्याने कोरोना होत नाही व नागरिकांनी रक्तदान करावे यासाठी रक्तपेढीच्यावतीने वारंवार आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला रक्त पुरवठ्याची अडचण येऊ नये याची काळजी घेतली जात आहे.
- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक- जनकल्याण रक्तपेढी

या पूर्वी नऊ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदात्यांची गर्दी टाळण्यासाठी रक्तपेढीमध्ये प्रत्येकाला ठराविक वेळ दिली आहे व त्यानुसारच रक्त संकलन केले जाते. तसेच स्वच्छतेवर जास्त भर दिली जात आहे.
- कौस्तुब कुलकर्णी, रक्तदाता 
 
आठ हजार रक्तपिशवी संकलीत करण्याचे उद्दीष्ट
ज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जनकल्याण रक्तपेढीने मोठे रक्तसंकलन अभियान हाती घेतले आहे. या अभियान अंतर्गत २३ जूनपर्यंत सुमारे आठ हजार रक्तपिशवी संकलित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे रक्तदान अभियान प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस शनिवार व रविवारी हाेणार असून त्याकरिता पुणे पाेलिस व जनकल्याण रक्तपेढीने पूर्व परवानगीने रक्तदात्यांना पत्र उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रक्तपेढीतर्फे आवश्यक ती काळजी घेऊन गर्दी न करता रक्तदान करण्याची व्यवस्था तयार केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune citizens showing interest for blood donation