पुणेकरांनो काळजी नको; दूधा विक्रीसंदर्भात पोलिसांचे स्पष्टीकरण

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

हराच्या वेगवेगळ्या भागात कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. संबंधीत भागात नागरिकांना संचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

पुणे : नागरिकांना दूध आणण्यासाठी बाहेर पडू नये, मात्र घरोघरी दूध वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहील. तसेच भाजीपाला व किराणा दुकानांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत नागरिकांनी सामाजिक अंतर पालन करावे, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहराच्या काही भागात मंगळवारी पोलिसांनी दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले. सिंहगड रोड परिसरात पोलिसांनी दूध विक्रेत्यांच्या वाहनांची हवा सोडणे, ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना माघारी पाठविले. याच पद्धतीने अनेक ठिकाणी पोलिसांनी दुधाच्या गाड्याही माघारी पाठविल्या. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. याबाबत डॉ. वेंकटेशम म्हणाले, "शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. संबंधीत भागात नागरिकांना संचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असे असतानाही नागरिक दूध घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत नागरिक गर्दी करत आहेत. सामाजिक अंतर पालन केले जात नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी दूध आणायला बाहेर पडू नये. भाजीपाला, किराणा दिलेल्या वेळेत गर्दी न करता जास्त दिवसांचा घेऊन ठेवावा."

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

घरोघरी दूध पुरवठा व्यवस्था सुरळीत सुरू राहणार आहे. फक्त नागरिकांनी बाहेर पडू नये. ९५ टक्के नागरीक नियमांचे पालन करीत आहेत. केवळ ५ टक्के नागरीक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. कोरोना विषाणूचा  संसर्ग झालेल्या लोकांमध्ये भाजीपाला विक्रेता, किराणा दुकानदार, औषध विक्रेते यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune city milk supply will resume regularly police clarification