पुणेकरांनी फ्ल्यूची लक्षणं दिसल्यास काय करायचं? ही बातमी वाचा!

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर 10 दिवसानंतर या रुग्णामध्ये हा आजार गंभीर किंवा जीवघेणा होत आहे.

पुणे Coronavirus : फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महापालिकेच्या कोव्हिड-19 केंद्रात (केअर सेंटर) उपचार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक फ्ल्यू सारखी (सर्दी, खोकला, ताप) लक्षणे आढळून आल्यानंतर स्वत: उपचार करवून घेत आहेत किंवा स्थानिक खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर 10 दिवसानंतर या रुग्णामध्ये हा आजार गंभीर किंवा जीवघेणा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी फ्ल्यू सारखी लक्षणे दिसून आल्यास महापालिकेच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये दाखवून घ्यावे. अशा क्लिनिकमधील डॉक्टर नागरिकांच्या लक्षणाच्या आधारे कोविड-19 साठी चाचणी करायची आवश्यकता आहे की नाही याबाबत निर्णय घेतील.  कोव्हिड-19 साठी चाचणी करावयाची आवश्यकता असल्यास पुणे शहरात  19 ठिकाणी कोव्हिड-19 च्या निदानाकरीता नमुने घेण्याची सोय केली आहे.

काही रुग्णालयांची नावे
नायडू रुग्णालय, ससून सामान्य रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध, भारती विद्यापीठ, डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, भोसरी रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, सहयाद्री रुग्णालय, कोथरुड.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नमुने घेऊन उपचार
जिल्हयातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोणत्याही रुग्णास फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फ्ल्यू क्लिनीकमध्ये किंवा कोव्हिड केअर केंद्रामध्ये नायडू रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ससून सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध याठिकाणी पाठवावे. अशा रुग्णांना वेळेवर पाठवून दिल्यास त्यांची आवश्यकतेनुसार कोव्हिड-19 साठी नमुने घेऊन निष्कर्षानुसार औषधोपचार करता येतील, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

शहरात कोरोना बाधित रुग्णांमध्ये मृत्युदराचे प्रमाण वाढले आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे मधुमेह, हृदयरोग, किडनीचा विकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला असल्यास महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्येच तपासणी करून घ्यावी, ही कळकळीची विनंती.
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune flue patients regional commissioner instructions