#Lockdown2.0 : सांगवीत माँर्निंग वॉक करणाऱ्यावर कारवाई

मिलिंद संधान
Monday, 20 April 2020

नवी सांगवीमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर सांगवी पोलिसांनी आज कारवाई केली. पहाटे सहा वाजल्यापासूनच येथील पोलिस जुनी सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात या हौश्यांवर लक्ष ठेऊन होते. व्यायामासाठी बाहेर पडलेल्या अशा शंभरहून अधिक लोकांना पोलिस ठाण्यात बसवून त्यांचे पोलिस ठाण्याचे प्रमुख ज्ञानेश्वर साबळे यांनी उद्बोधन तर केलेच त्याच बरोबर त्यांना सक्त ताकिदही दिली.

नवी सांगवी (पुणे) - सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर सांगवी पोलिसांनी आज कारवाई केली. पहाटे सहा वाजल्यापासूनच येथील पोलिस जुनी सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात या हौश्यांवर लक्ष ठेऊन होते. व्यायामासाठी बाहेर पडलेल्या अशा शंभरहून अधिक लोकांना पोलिस ठाण्यात बसवून त्यांचे पोलिस ठाण्याचे प्रमुख ज्ञानेश्वर साबळे यांनी उद्बोधन तर केलेच त्याच बरोबर त्यांना सक्त ताकिदही दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी या मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांकडून व्यायामही करून घेतला. रस्त्यावरच पूशअप सारख्या व्यायामाने घामाघूम केले. त्यामुळे एका बाजुने उद्बोधन तर दुसऱ्या बाजुने सक्त ताकीद मिळाल्याने हे सर्व चांगलेच हिरमुसले होते. तर त्याचवेळी पोलिसांनी या सर्वांना आपापल्या मोबाईल मध्ये फोटो काढून त्यांच्या मित्रपरिवाराच्या ग्रुपवर ते फोटो अपलोड करावयास सांगून संचाब बंदीचे काटेकोटपणे पालन करण्याचा इशारा दिला.

याच वेळी मास्क परिधान न केलेल्यांवर कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे सांगवी परिसरात आता मॉर्निग वॉकला जाण्यास कोणीही धजावरणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime on morning walk people in new sangvi