Coronavirus : घाबरू नका, लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक सेवा सुरुच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

- २१ दिवसांच्या 'लॉक डाऊन'च्या काळातही जीवनावश्यक सेवा  राहतील पूर्वी प्रमाणेच सुरळीत.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा ' लॉक डाऊन' जाहीर केला असून, या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम १४४ च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. २१ दिवसाच्या 'लॉक डाऊन'च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण दुकानात गर्दी करू नका. कोणीही घाबरू नये. सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी.  

तसेच घराबाहेर पडू नये. कोरोनाविरोधात आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून, सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepak mhaisekar talked about supply of Essential Goods in Lock down Period