कोरोनाच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष, सुविधा वाढवा; मुख्यमंत्र्यांची महापालिकेला सूचना 

uddhav-thackeray
uddhav-thackeray

पुणे - संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी कोरोनाचे रुग्ण, संशयित आणि घरीच विलग राहण्याचा सल्ला दिलेल्या लोकांच्या उपचारांत उणीव राहणार नाही, याकडे लक्ष देतानाच विलगीकरण कक्ष, तेथील सेवा-सुविधा वाढविण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेला केल्या आहेत. या मोहिमेसाठी महापालिकेला तज्ज्ञ डॉक्‍टारांसह आरोग्य अधिकारी-कर्मचारी पुरविण्यात येतील, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारमधील मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "व्हिडिओ कॉन्फरसिंग'द्वारे महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शंतनू गोयल, आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे हे उपस्थित होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांत केलेल्या कामाबद्दल महापालिकेतील अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केले. 

पुणे शहरात महापालिकेने उभारलेल्या विलगीकरण कक्षांची क्षमता सध्या 605 इतकी आहे. त्याशिवाय शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृहात दोन हजार खाटांची सोय होणार आहे. तरीही पुढच्या काही दिवसांत आणखी दीड हजार खाटांच्या क्षमतेचे कक्ष उभारण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी जागांचा शोध घेऊन फर्निचर आणि अन्य सुविधा निर्माण करण्याच्या सूचना सरकारने महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी सर्व पातळ्यांवर सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. 

त्याचवेळी सध्या डॉ. नायडू हॉस्पिटलमधील कोरोनाच्या रुग्णांसह ज्या विलगीकरण कक्षातील लोकांवरील उपचारदरम्यानच्या अडचणी आहेत का? हेही जाणून घेत, पुरेसे डॉक्‍टर उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत,अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com