esakal | जुनी सांगवीत दूध वितरणात येताहेत अडचणी
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीत दूध वितरणात येताहेत अडचणी

- नागरिक रस्त्यावर दूध वितरणाची वेळ बदलण्याची किरकोळ विक्रेत्यांची मागणी.

जुनी सांगवीत दूध वितरणात येताहेत अडचणी

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवीत आज (मंगळवार) किरकोळ दूध वितरकांनी दूध वितरण न केल्याने नागरिक दुधाच्या शोधात बाहेर पडून गर्दी करत आहेत. सध्या शासनाकडून सकाळी दहा ते एक यावेळेतच जीवनावश्यक वस्तूंना विक्रीसाठी मुभा आहे. यात दूध विक्रेत्यांची व स्थानिक प्रशासनाचीही अडचण निर्माण झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुधाच्या गाड्या पहाटे दोन ते तीन दरम्यान येत असल्याने अनेक किरकोळ दूध वितरकांकडे दूध शितगृह साठवणूकीसाठी व्यवस्था नाही. दूध डेअरी व्यावसायिकांकडेही साठवणुकीची मर्यादा असल्याने दूध खरेदीसाठी झुंबड उडत आहे. किरकोळ विक्रेते म्हणताहेत, विक्रेत्याकडील दुध आम्ही साठवणार कसे? पहाटे आलेले दुध सकाळी दहापर्यंत खराब होत असल्याने त्याचा फटका किरकोळ दूध विक्रेत्यांना बसत असल्याने दूध वितरणासाठी सकाळी मुभा द्यावी, असे जुनी सांगवीतील किरकोळ विक्रेता रूपेश पुजारी याने सांगितले.

तर याबाबत सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. दूध वितरकांनी दूध खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. तशी व्यवस्था दूध वितरकांकडून करण्यात यावी.

loading image
go to top