मोफत तांदूळाचे ई-पॉजद्वारे वाटप करा - अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामधील प्राधान्य कुटूंब, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना ई-पॉजद्वारे मोफत तांदळाचे वाटप केले जावे. तत्पूर्वी, लाभार्थ्यांनी नियमित धान्याची उचल केली अथवा नाही याची खात्री करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने केल्या आहेत.

पिंपरी - पुणे व पिंपरी चिंचवड शहरामधील प्राधान्य कुटूंब, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना ई-पॉजद्वारे मोफत तांदळाचे वाटप केले जावे. तत्पूर्वी, लाभार्थ्यांनी नियमित धान्याची उचल केली अथवा नाही याची खात्री करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने केल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटूंब, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे, जून महिन्यांसाठी त्यांच्या नियमित देय धान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य व प्रतिमाह प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे. 

शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाकडून राज्याला लाभार्थ्यांसाठी तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. त्यानुसार, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला सुमारे साडे सात हजार मेट्रिक टन तांदूळ मिळणे अपेक्षित आहे. चालू एप्रिल महिन्याचे नियमित धान्याची उचल केल्यावर १५ एप्रिल नंतर तांदूळ रास्त भाव दुकानदारांपर्यंत पोचविला जाणार आहे. त्यानंतर, दुकानदारांनी ई-पॉज मशीनद्वारे त्याचे लाभार्थ्यांना वितरण करणे आवश्यक करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribute free rice through e-pause Order of the Food and Civil Supplies Department