राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत दोन हजारांहून अधिक धान्याचे किट वितरण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

रेशन कार्ड नसलेल्या परगावातील कुटुंबांना, गरजू विद्यार्थ्यांना ग्राहक पेठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत दोन हजारांहून अधिक  धान्याचे किट देण्यात आले. शहर व उपनगरांतील विविध भागांमध्ये हे वितरण करण्यात आले.

पुणे - रेशन कार्ड नसलेल्या परगावातील कुटुंबांना, गरजू विद्यार्थ्यांना ग्राहक पेठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत दोन हजारांहून अधिक धान्याचे किट देण्यात आले. शहर व उपनगरांतील विविध भागांमध्ये हे वितरण करण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेमार्फत ग्राहकांच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत व सामान्य नागरिकांच्या सहकार्याने हे किट देण्यात आले आहेत. उपक्रमाकरीता शैलेश राणीम, किरण गुंजाळ, उदय जोशी, सुनील वाणी यांसह  सूर्यकांत पाठक, संचालक  अनंत दळवी, अलका दळवी, व्यावसायिक धवल शहा, राजेश शहा, संजय फडतरे, गिरीश ओसवाल, विजय ओसवाल, सतिश जैन, जयंत शेटे यांनी पुढाकार घेतला. 

पाठक म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या या किटमध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, दोन किलो साखर, एक लिटर तेल, चहा व मसाला इत्यादी साहित्य देण्यात आले आहे. पुणेकरांनी या उपक्रमाकरीता सहकार्य करुन गरजूंपर्यंत किट पोहोचविण्यास आम्हाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of over two thousand grain kits through RSS