Coronavirus : प्रादुर्भाव टाळण्यासाठी व जनजागृतीसाठी रेखाटले संकल्पचित्र

डी. के. वळसे पाटील
Friday, 17 April 2020

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने २० बाय २० फुट व्यासाचे पेंटच्या सहाय्याने संकल्प चित्र रेखाटले आहे. आपल्यापासून हजारो कोस (2982km) दूर असणारा आजार आज आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वेशीवर येऊन उभा राहिला आहे.

मंचर - येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने २० बाय २० फुट व्यासाचे पेंटच्या सहाय्याने संकल्प चित्र रेखाटले आहे. आपल्यापासून हजारो कोस (2982km) दूर असणारा आजार आज आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वेशीवर येऊन उभा राहिला आहे. “कृपया नियम पाळा. घराबाहेर जाणे टाळा. तरच बसेल कोरोनाला आळा...” असा प्रतीकात्मक चित्रातून संदेश दिला आहे. प्रशासनाने चित्र रेखाटणारे यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिरचे कलाशिक्षक संतोष चव्हाण यांनी चित्र रेखाटले आहे. उद्योजक दीपक चौरे, निलेश थोरात, एस बी रोकडे, रामभाऊ ढगळे,  राजू पोंदे, नयना रोकडे या सर्वांनी सुमारे पाचतास  परिश्रम घेऊन हे काम केले आहे.

मंचर (ता.आंबेगाव) येथे कोरोना विषानुना रोखण्यासाठी काढण्यात आलेल्या संकल्प चित्रामुळे जनजागृती झाली आहे. कलाशिक्षक संतोष चव्हाण व त्यांच्या टीमचे अभिनंदन. कृपया मोबाईलवर चित्र झूम करून पहावे. चित्र पाहण्यासाठी कोणीही चौकात जाऊ नये. असे आव्हान मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drawings for prevention and awareness of the outbreak