esakal | Coronavirus : औषधी पुरवठादार पेचात; वाहतूकदार तयार होईनात; पोलिस ट्रक सोडेनात
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : औषधी पुरवठादार पेचात; वाहतूकदार तयार होईनात; पोलिस ट्रक सोडेनात

निगडी ट्रान्स पोर्ट नगरीतील माल वाहतूकदार  वाहतुकीसाठी तयार नाहीत आणि  भिवंडीतून निघालेले काही ट्रक पोलिसांनी तिथेच अडविले आहेत. त्यामुळे शहरात औषधे येवू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या आठ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे प्रवक्ता संदीप चत्तुर यांनी सांगितले.

Coronavirus : औषधी पुरवठादार पेचात; वाहतूकदार तयार होईनात; पोलिस ट्रक सोडेनात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - निगडी ट्रान्स पोर्ट नगरीतील माल वाहतूकदार  वाहतुकीसाठी तयार नाहीत आणि  भिवंडीतून निघालेले काही ट्रक पोलिसांनी तिथेच अडविले आहेत. त्यामुळे शहरात औषधे येवू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या आठ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे प्रवक्ता संदीप चत्तुर यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सेनिटायझर व अँटिबायोटिक्स औषधांची मागणी वाढली आहे. यासह अन्य औषधे चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारातून शहर परिसरातील मेडिकल स्टोअर्स मध्ये पुरवली जातात. सध्याचा लॉक डावून व कोरोना ची स्थिती पाहता दवा बाजाराचा आढावा घेतला. त्याबाबत पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे प्रवक्ता संदीप चात्तुर म्हणाले, '' लॉक डा वून मुळे ट्रक चालक व वाहतूकदार वाहतुकीसाठी तयार नाहीत. आपल्याकडे भिवंडी येथून औषधे येतात. पण, तेथून निघालेले ट्रक भिवंडी पोलिसांनी अडविली आहेत. मागणी खूप v पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या आठ ते दहा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून पोलिसांनी ट्रक सोडायला हवेत. ट्रक व औषधी वाहक वाहनांचे सेनिटायझेशन करायला हवे. त्यासाठी महापालिकेने मदत करावी. तसेच ट्रक चालक व अन्य सबंधित व्यक्तींचे प्रबोधन करायला हवे. त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. तसेच औषधी पॅकेजिंग सहित्याचाही तुटवडा आहे.'' 

दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, औषधांच्या ट्रक भिवंडी पोलिसांनी अडविल्या असतील तर, केमिस्ट असोसिएशन व औषधी पुरवठा दारांनी पोलिस आयुक्तांना कल्पना द्यायला हवी. ते भिवंडी पोलिसांशी बोलतील व प्रश्न सुटेल. मी ही असोसिएशन चे पदाधिकारी व पोलिस आयुक्तांशी बोलतो.

loading image
go to top