coronavirus : 'ईएसआयसी'च्या लाभार्थ्यांना कोविड 19 पासून विमा संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

पुणे येथील बिबवेवाडी आणि पिंपरी चिंचवड येथील मोहन नगर मध्ये ईएसआयसीची रुग्णालये आहेत. तसेच चिंचवड, भोसरी, तळेगाव आणि हडपसर येथे प्रत्येकी एकेक दवाखाने असून ते सर्व चालू आहेत. याखेरीज, दोन्ही शहरांमध्ये एकूण मिळून सुमारे दीडशे खासगी डॉक्टर्स ईएसआयसीशी जोडले गेले आहेत. या ठिकाणी जवळपास ४० आजारांपासून लाभार्थी कामगार आणि त्याच्या कुटूंबांना विमा संरक्षण दिले जाते. तसेच त्यांच्या आजारांवर वैद्यकीय उपचार देखील केले जातात. 

पिंपरी - कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या  (ईएसआयसी) लाभार्थी कामगारांना 'कोविड 19' आजारावर विमा संरक्षण मिळणार आहे. याखेरीज, 'ईएसआयसी' च्या दवाखान्यांमध्ये कोरोना संशयित रूग्णांना विनामूल्य उपचार घेता येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे येथील बिबवेवाडी आणि पिंपरी चिंचवड येथील मोहन नगर मध्ये ईएसआयसीची रुग्णालये आहेत. तसेच चिंचवड, भोसरी, तळेगाव आणि हडपसर येथे प्रत्येकी एकेक दवाखाने असून ते सर्व चालू आहेत. याखेरीज, दोन्ही शहरांमध्ये एकूण मिळून सुमारे दीडशे खासगी डॉक्टर्स ईएसआयसीशी जोडले गेले आहेत. या ठिकाणी जवळपास ४० आजारांपासून लाभार्थी कामगार आणि त्याच्या कुटूंबांना विमा संरक्षण दिले जाते. तसेच त्यांच्या आजारांवर वैद्यकीय उपचार देखील केले जातात. 

ईएसआयसी, पुणेचे उपसंचालक राजेश सिंग म्हणाले,"कोरोना बाधित रुग्णांवरील वैद्यकीय उपचाराबाबत वेगळा असा निर्णय झालेला नाही. परंतु, आमच्या दोन्ही रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये महामंडळाकडील नोंदणीकृत लाभार्थी असलेल्या कोरोना संशयित रूग्णांवर विनामूल्य वैद्यकीय उपचार केला जाईल. एखाद्या लाभार्थ्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यालाही महामंडळाच्या विम्याचे संरक्षण दिले जाईल. उपचार पूर्ण झाल्यावर संबंधित लाभा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ESIC beneficiaries insurance coverage from Covid 19