मुळशीच्या पूर्व पट्ट्यातील काही दुकाने सुरु; ग्राहकांच्या रांगा, पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांनी आज सकाळीच खऱ्या अर्थाने आरोग्याची गुढी उभारली.

पिरंगुट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांनी आज सकाळीच खऱ्या अर्थाने आरोग्याची गुढी उभारली. गुढी पाडव्याच्या सणानिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक किराणा, दूध विक्रीच्या दुकानांसमोर अंतर राखून रांगोळी आखून चौकोन तयार करून  ग्राहकांच्या रांगा तयार करून घेतल्या.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांच्या या कार्यामुळे सुरक्षित अंतर तर राखले गेलेच शिवाय शिस्त राखून गर्दी रोखण्यात यश मिळविले. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सकाळपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सहकाऱ्यांसह ही मोहीम यशस्वी सुरू केल्याने ग्राहकही खूश आहेत.  

पिरंगुट (ता.मुळशी) येथील गावठाण, कोकण वाहिनी असलेला पुणे माणगाव रस्ता,  कॅम्प भाग, घोटावडे फाटा,  सूस, नांदे, चांदे, लवळे आदी भागात  सर्वच दुकानासमोर हे चित्र दिसत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Essential Commodities available in Mulshi