Coronavirus : झोपडपट्ट्यांत दारापर्यंतचे धान्य वितरण असफल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अंत्योदय,  अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिका धारकांना नाममात्र दरात गहू, तांदूळाचे वाटप केले जात आहे. दोन्ही शहरांतील झोपडपट्ट्यांत धान्य वितरण करताना गर्दी होऊ नये यासाठी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने एकूण २७० दुकानदारांमार्फत प्रत्येक घराच्या दारापर्यंत धान्य वाटप करण्याचे नियोजन केले होते.  त्यासाठी, प्रत्येक वस्तीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. तसेच वाटपापूर्वी संबंधित शिधापत्रिका धारकांना कळविले जात होते. त्यानुसार, धान्य वाटप चालू करण्यात आले होते. परंतु, ते करताना नागरिकांची गर्दी होत आहे.

पिंपरी - पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्ट्यांमध्ये घरांच्या दारापर्यंत धान्य वाटप करण्याचा हेतू असफल झाला आहे. त्यामुळे, बहुतांश ठिकाणी दुकानांमधूनच लोकांना धान्य वाटप केले जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अंत्योदय,  अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिका धारकांना नाममात्र दरात गहू, तांदूळाचे वाटप केले जात आहे. दोन्ही शहरांतील झोपडपट्ट्यांत धान्य वितरण करताना गर्दी होऊ नये यासाठी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने एकूण २७० दुकानदारांमार्फत प्रत्येक घराच्या दारापर्यंत धान्य वाटप करण्याचे नियोजन केले होते.  त्यासाठी, प्रत्येक वस्तीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. तसेच वाटपापूर्वी संबंधित शिधापत्रिका धारकांना कळविले जात होते. त्यानुसार, धान्य वाटप चालू करण्यात आले होते. परंतु, ते करताना नागरिकांची गर्दी होत आहे. आम्हाला धान्य कधी मिळणार? याची विचारणा नागरिक करत आहेत. त्याने, गर्दी न करण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.  रास्त भाव दुकानासमोर नागरिक रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे.

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने देखील त्याला दुजोरा दिला. तसेच या ठिकाणी दुकानांमधून धान्य वाटप केले जात असल्याचे नमूद करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Failure to distribute grain at the door to the huts failed