लढा कोरोनाशी : पुण्यात औषधांसाठी एफडीएचा नियंत्रण कक्ष

FDAs Control Room for medicine in Pune
FDAs Control Room for medicine in Pune

पुणे : राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे औषध उत्पादन आणि वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रातही या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाला औषध उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध ही अत्यावश्यक सेवेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, औषधाचे वितरण आणि त्याचे उत्पादन यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यातून तातडीने मार्ग काढण्याच्या दृष्टीने एफडीए च्या मुख्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस आधीक्षक तथा एफडीएचे सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणात हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. औषध वितरणातील काही अडथळे असल्यास नियंत्रण कक्षाची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी 1800222364 किंवा 020-26592362 किंवा 63 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com