पुणे जिल्ह्यातील तब्बल एवढ्या कुटुंबांना झाले अन्नधान्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

तालुकानिहाय पात्र कुटुंब

 • खेड - ४ हजार २३८
 • शिरुर - ४ हजार १८६
 • मुळशी - ४ हजार १७
 • हवेली - तीन हजार ४८४
 • दौंड - १ हजार ८३१
 • पुरंदर - २ हजार १३७
 • भोर - १ हजार ५६०
 • बारामती - ६९९
 • इंदापूर - ६९८
 • जुन्नर - ६६५
 • मावळ -४५९
 • आंबेगाव -२७२
 • वेल्हे -१२६

पुणे - लॉकडाउनच्या कालावधीत एकही व्यक्ती केवळ रोजगार आणि पैशाअभावी उपाशी राहू नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुंबांना पुढील दोन आठवड्यासाठीचे अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. या सर्व कुटुंबातील कमाल चार व्यक्तींना प्रत्येकी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहु असे पाच किलो असे एकूण ३३० मेट्रिक टन अन्नधान्य  वाटप केले जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासाठी जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागाच्या पुढाकाराने विविध संस्था आणि कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) हे अन्नधान्य जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्नावाचून उपाशी राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या शरद भोजन‌ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील हा उपक्रम असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी  सांगितले.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

यासाठी निवडण्यात आलेल्या सर्व कुटुंबातील मिळून ६५ हजार ७९९ व्यक्तींना लाभ मिळणार आहे. वाटप कल्या जाणाऱ्या अन्नधान्यात १९८ मेट्रिक टन तांदूळ आणि १३२ मेट्रिक टन गहू वाटप केले जाणार आहे.    

या अन्नधान्याची वाहतूक, हमाली आणि साठवणूक खर्चासाठी  प्रति लाभार्थी १३ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्लक संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीत जमा केले जाणार आहे. यानुसार सर्व ग्रामपंचायतींना मिळून एकूण ८ लाख ५५ हजार ३८३ रूपये जमा होऊ शकणार आहेत. 

तालुकानिहाय पात्र कुटुंब

 • खेड - ४ हजार २३८
 • शिरुर - ४ हजार १८६
 • मुळशी - ४ हजार १७
 • हवेली - तीन हजार ४८४
 • दौंड - १ हजार ८३१
 • पुरंदर - २ हजार १३७
 • भोर - १ हजार ५६०
 • बारामती - ६९९
 • इंदापूर - ६९८
 • जुन्नर - ६६५
 • मावळ -४५९
 • आंबेगाव -२७२
 • वेल्हे -१२६

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food grains were distributed to so many families in Pune district