Coronavirus : चारशे जण विलगीकरण कक्षात

Separation
Separation

तळेगाव दाभाडे - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर तळेगावात ४३४ जणांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर दिल्ली, निजामुद्दीन संदर्भात १६ जणांची यादी प्राप्त झाली असून त्यात बदलीच्या अनुषंगाने दिल्ली येथे गेलेल्या सीआरपीएफ व एनडीआरएफमधील जवानांसह इतरांचा केवळ विमान-प्रवास, रेल्वे बुकींग आणि मोबाइल टॅावरशी संपर्क आल्याचे निदर्शनास आले आहे.

सैन्यदलाच्या जवानांची ससून येथे तपासणी करण्यात आली आहे. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून संबंधितांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. यात स्थानिक मुस्लिम बांधवांचा निजामुद्दीन कार्यक्रमाशी संबंध आला नसल्याचे नगर ेपरिषद मुख्याधिकारी दीपक झिंजाड व वैद्यकीय अधिकारी डॅा. प्रविण कानडे यांनी स्पष्ट केले आहे. विलगीकरण कक्षात ठेवलेल्या ४३४ जणांमध्ये परदेशी ५६, परराज्य व पुणे-मुंबई येथील २८६ असे ३४२ जण असून ९२ जण ग्रामीणमधील आहेत.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये १६ जणांची यादी नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झाली आहे. यात केंद्रीय सुरक्षा बल व एनडीआरएफच्या पाच जवानांचा समावेश आहे. संबंधितांची ससून रुग्णालयात तपासणी केली असून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून यातील दोघांना सीआरपीएफच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तर तिघांना मायमरच्या डॅा. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. दिल्ली-निजामुद्दीन संदर्भात एका महिलेची तपासणी केली असून चाचणी निगेटीव्ह आल्याने तीलाही मायमरच्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. प्राप्त यादीतील सेनादलाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱयाला सोमवारी (ता. ६) ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविल्याची माहिती डॉ. कानडे यांनी दिली.  

यादीतील उर्वरीतांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असून बदली झाल्याने एनडीआरएफमधील जवान बदलीच्या ठिकाणी गेले आहेत. तर फरीदाबाद, तमिळनाडू व निजामुद्दीन येथे प्रत्येकी एकजण असल्याचे डॉ. कानडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com