coronavirus: स्वस्त आणि ताजी भाजी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 

coronavirus: स्वस्त आणि ताजी भाजी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 

पुणे - मार्केट यार्ड बंद झाल्याने भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झालेला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या अधिकारी, कर्मचार्यांसाठी थेट शेतकर्यांकडून भाजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्वस्त आणि ताजी भाजी उपलब्ध झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'मुळे गुलटेकडी येथील व्यापार्यांनी खरेदी-विक्री बंद केली आहे. त्यामुळे शहरात भाजी, फळांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या विक्रेत्यांकडे भाजी आहे, ते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून ग्राहकांची लूट करत आहेत. 

या पार्श्वभूमीवर विद्यापीठ क्वार्टर मधील रहिवाश्यांना बाहेर यायची वेळ येऊ नये यासाठी काही अधिकारी व कर्मचार्यांनी पुढाकार घेऊन मुळशी व लोणीकंद परिसरातील शेतकर्यांशी संपर्क करून  विद्यापीठ परिसरात रहाणार्यांसाठी भाजी पुरवठा करणार का याबाबत विचारणा केली होती. यासाठी शेतकरी तयार झाले आहेत. 

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

गुरूवारी सकाळी पहिलेंदा  हा प्रयोग करण्यात आला, त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शेतकर्यांना मार्केट यार्डपेक्षा जास्त पैसे मिळत असून, ग्राहकांनाही स्वस्तात भाजी उपलब्ध झाली आहे. याचा फायदा जवळपास २ हजार जणांना झाला आहे. 
विद्यापीठात नवीन वर्ग ३ इमारत, आर्य क्रीडा मंडळ आणि धोबी घाट व पोस्ट परिसर या तीन ठिकाणी भाजी विक्री होत आहे. पुढील काही दिवस आवश्यकतेनुसार शेतकर्यांकडून भाजी मागवली जाईल. रोज सकाळी दोन तास  व संध्याकाळी दोन तास भाजी विक्री केली जाईल, असे विद्यापीठांच्या गृहव्यवस्थापन विभागाचे प्रमुख मनोहर राजपूत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com