Coronavirus : पुण्यात दवाखाने दिवसभर उघडे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

वस्तीमित्र हेल्पलाइन
पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्‍ट आदी संस्थेच्या सहकार्याने ‘कोरोना विरुद्ध वस्तीमित्र हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली आहे. याबाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी ०२०- २५५०६९२३/ २४/२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

वैद्यकीय तपासणी
पालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत कोरोनाबाधित भागांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी या वैद्यकीय पथकांना रुग्णवाहिका, औषधे आणि इतर साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे - ‘शहरातील कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपाययोजना केल्या आहेत. त्या अंतर्गत शहरातील ठराविक दवाखाने सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महानगरपालिका क्षेत्रातील सुरू राहणारे दवाखाने पुढीलप्रमाणे: बाई भिकायजी पेस्तनजी बम्मनजी दवाखाना-भवानी पेठ, कै. आनंदीबाई नरहर गाडगीळ दवाखाना-दत्तवाडी, कै. बाळाजी रखमाजी गायकवाड दवाखाना-गंजपेठ, हिंदू ह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना-मित्रमंडळ चौक, कै. कलावतीबाई मावळे दवाखाना-नारायण पेठ, कै. मामासाहेब बडदे दवाखाना-नाना पेठ, हुतात्मा बाबुगेनू दवाखाना-रविवार पेठ, कै. शिवशंकर पोटे दवाखाना-सहकारनगर, कै. मुकुंदराव लेले दवाखाना-शनिवार पेठ, कै. रोहिदास किराड दवाखाना-गणेशपेठ, ग. भा. हिंदुमती मणिलाल खन्ना दवाखाना-महर्षीनगर, कै. बापूसाहेब गेणूजी कवडे पाटील दवाखाना-कोरेगाव पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखाना-डायसप्लॉट, जनता वसाहत दवाखाना-जनता वसाहत, युगपुरुष राजा शिवछत्रपती- बिबवेवाडी (अप्पर), पुणे मनपा दवाखाना-वडगाव, स्व. विलासराव तांबे दवाखाना-धनकवडी, कै. कलावतीबाई तोडकर दवाखाना-सोमवार पेठ, श्री सद्‌गुरू शंकर महाराज दवाखाना-बिबवेवाडी, स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना अप्पर इंदिरानगर, हजरत मौलाना युनूस साहब रहेमतुल्ला अलेही दवाखाना-संतोषनगर कात्रज, कै. रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना-जांभूळवाडी रोड आंबेगाव खुर्द, कै. जंगल राव कोंडिबा अमराळे दवाखाना-शिवाजीनगर, डॉ. दळवी रुग्णालय-शिवाजीनगर, पुणे मनपा दवाखाना-पांडवनगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: full day hospital in pune