जनता कर्फ्यूला मिळतोय चांगला प्रतिसाद; जुन्नरमध्ये शुकशुकाट

दत्ता म्हसकर
रविवार, 22 मार्च 2020

जुन्नरला बाजारपेठा थंडावल्या, रस्त्यावर शुकशुकाट तर वाहनांची वर्दळ थांबली.

जुन्नर : जुन्नरला बाजारपेठा थंडावल्या, रस्त्यावर शुकशुकाट तर वाहनांची वर्दळ थांबली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूस जुन्नरला नागरिकांनी सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज ता.२२ रोजी जाहीर केलेल्या  कर्फ्यूस  शंभर टक्के  प्रतिसाद मिळला आहे.  सकाळी आठ पासून शहरातील बाजारपेठा बंद असून रस्त्यावर एकही व्यक्ती किंवा वाहन दिसत नाही.नवे व जुने बसस्थानक, धान्य बाजार पेठ, नेहरुबाजार, सदाबाजार, रविवार पेठ, बाजार समिती परिसरात शुकशुकाट जाणवत होता.

वाहनांची वर्दळ थांबली होती. इतरत्र देखील पूर्णपणे शांतता दिसत आहे.रविवारचा आठवडे बाजार रद्द केल्याने परिसरातून येणारे लोक आपापल्या घरी थांबले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good Response to Janata Curfew in Junnar

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: