coronavirus:   किराणा हवा आहे... फक्त क्‍लिक करा!

grain
grain

पुणे - किराणा माल घ्यायचा म्हणजे दुकानात जाऊन यादी द्यायची. मग कितीतरी वेळ थांबायचे आणि जिन्नस घेऊन परतायचे. पण हे सारे आता वेबसाईटद्वारे काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. ग्राहकाने घरूनच वेबसाईटद्वारे यादी द्यायची आणि फक्त जाऊन किराणा घेऊन यायचा. दुकानातील गर्दी टाळण्यासाठी किराणा खरेदीचा हा प्रयोग दोन दिवसांपूर्वी शहरात सुरू झाला आहे. 

http://www.kiranaq.com या संकेतस्थळावर त्यासाठी ग्राहक आणि किराणा दुकानदार यांनी नोंदणी करायची आहे. ग्राहकाने संकेतस्थळावर त्याच्या घराजवळील किराणा दुकान निवडायचे. संकेतस्थळावर सुमारे तीन हजार वस्तूंची यादी आहे. त्यातून ग्राहकांनी त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची निवड करायची. ती यादी संबधित दुकानदाराला त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्‌सऍपवर जाते. त्याने त्या वस्तूंचे पॅकिंग पूर्ण केले की, एका लिंकवर क्‍लिक करायचे. त्यामुळे ग्राहकाला बिल किती झाले आहे, हे समजते. ती रक्कम ग्राहक रोख किंवा डिजिटल पेमेंटद्वारे देऊ शकतो. दुकानात पॅक केलेला माल ग्राहकाने स्वतः जाऊन घेतल्यावर हा व्यवहार पूर्ण होतो. 

कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे नागरिकांना दुकानांत थांबावे लागू नये, यासाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. त्यात कोणालाही कसलेही शुल्क द्यावे लागत नाही. सामाजिक जवाबदारीच्या भावनेतून आम्ही हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. 
- अजित थडानी, सॉफ्टवेअर डेव्हलपर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com