Coronavirus : चक्क ..वृद्धाश्रमातील मदतनिसांनीच काढला गावी पळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

'वृद्धांना कोरोना लवकर जडतो, मग आपल्यालाही लागण होईल' या भीतीने वृद्धाश्रमातील मदतनिसांनी जबाबदारी झटकून, कर्तव्याचे भान न ठेवता गावी पळ काढला. त्यामुळे वृद्धाश्रमचालक हतबल झाले आहेत.

पहा वृद्धाचा सांभाळ करणंही झाले अवघड; कर्तव्याचाच विसर
पिंपरी - 'वृद्धांना कोरोना लवकर जडतो, मग आपल्यालाही लागण होईल' या भीतीने वृद्धाश्रमातील मदतनिसांनी जबाबदारी झटकून, कर्तव्याचे भान न ठेवता गावी पळ काढला. त्यामुळे वृद्धाश्रमचालक हतबल झाले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वृद्धाश्रमातील अत्यवस्थ अवस्थेतील ज्येष्ठांच्या देखभालीसाठी सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे, शिवाय जन्मदात्यांनीही सध्य स्थितीत आई-बापांकडे पाठ फिरवली आहे. अचानक मृत्यू ओढवलेल्या ज्येष्ठांच्या अंत्यविधीलाही पोटच्या गोळ्यांनी गैरहजेरी लावल्याची लाजिरवाणी बाब समोर आली आहे.

अन्नधान्य, वृद्धांचा औषधोपचार तसेच अंघोळ व दोन वेळ जेवणाची सोय करण्यास वृद्धाश्रम चालकांना अडथळा येऊ लागला आहे. त्यातच वृद्धाश्रम चालकांकडे नातेवाईक व पोटच्या पोरांनीही विचारपूस करणे सोडले आहे. त्यामुळे ज्येष्ठांना लॉकडउनमध्ये सांभाळणे आवाहानात्मक झाले आहे.

वृद्धाश्रमांना नियमित मदत करणाऱ्या संस्था व सेवाभावी नागरिकही हतबल झाले आहेत. काही प्रमाणात सुरवातीला अन्नधान्याचा स्वयंस्फूर्तीने बऱ्याच जणांनी पुरवठा केला. मात्र, लॉकडाउन वाढल्याने आता वृद्धाश्रमाचा गाडा ओढणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. वृद्धाश्रम चालकांकडे सध्या अन्नधान्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. बऱ्याच जणांनी जवळच्या लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. पेन्शनही नातेवाइकांनी अद्यापपर्यंत वृद्धाश्रमात पोचविली नाही. शिवाय दरमहिन्याचे शुल्कही अद्यापपर्यंत जमा झाले नाही.

ही आहे वृद्धाश्रमांची व्यथा...
चिखलीतील 'दादा नाटेकर' संस्थेतील ज्येष्ठांना नातेवाइकांकडे गावी पाठवले आहे. या ठिकाणी सहा जण होते. तर किवळे येथील 'स्नेहसावली' या आश्रमाचे सुहास गोडसे म्हणाले, 'आम्ही ज्येष्ठांचे व्यवस्थित नियोजन केले आहे. घरातील सर्व मंडळी राबत आहोत. परिवारानेच सर्वांची जबाबदारी उचलली आहे.' चिंचवड येथील 'सुवर्णनगरी' वृद्धाश्रमाचे नितीन धेडे म्हणाले, 'आमचे काही मदतनीस बाहेर गावचे होते. त्यामुळे ते अचानक गावी निघून गेले. सध्या ज्येष्ठांचे औषधपाणी व सेवा करण्यासाठी कोणीही नाही. मी व माझी पत्नी दिवसभर राबतो. स्वयंपाकी आहे. मात्र, अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांच्या मदतीसाठी कोणीही धावून येत नाही. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाही. जोखमीच्या अवस्थेत असलेल्या वृद्धांना अत्यावश्‍यक सेवेसाठी ऍडमिट करणे गरजेचे असल्यास स्वतंत्र यंत्रणेचा तुटवडा आहे. त्यासाठी मनुष्यबळ हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The helpers of the old homestead escaped the village

Tags
टॉपिकस