esakal | Coronavirus : हिंजवडीतील बगाडाची मिरवणूक कोरोनामुळे रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Hinjewadi-Bagad

शेकडो वर्षांपासून चालत आलेली हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या बगाडाची मिरवणूक यंदा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय हिंजवडी वाकड ग्रामस्थांनी घेतला आहे.

हिंजवडी वाकड ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाचा उत्सव दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरा होत असतो. मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर बगाडाची मिरवणूक व काटेरी पालखी, असे या उत्सवाचे खास आकर्षण असते. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक हिंजवडी ला येत असतात.

Coronavirus : हिंजवडीतील बगाडाची मिरवणूक कोरोनामुळे रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हिंजवडी - शेकडो वर्षांपासून चालत आलेली हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या बगाडाची मिरवणूक यंदा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय हिंजवडी वाकड ग्रामस्थांनी घेतला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंजवडी वाकड ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाचा उत्सव दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरा होत असतो. मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर बगाडाची मिरवणूक व काटेरी पालखी, असे या उत्सवाचे खास आकर्षण असते. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक हिंजवडी ला येत असतात. तब्बल आठवडाभर दोन्ही गावात मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा होत असतो. बगाडाच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रथाची तयारी आठ दिवस आधीपासून केली जाते.  मात्र यंदाच्या उत्सवावर कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचे संकट आल्याने यंदा चा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष संदीप पंढरीनाथ साखरे यांनी सांगितले. 

कोरोनाचा वाढता धोका पाहून सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत . मिरवणूक रथावर लावण्यात येणारे शेले (लाकूड) आणण्यासाठी दोन्ही गांवातील शेकडो तरुण भाविक बारपे येथील जंगलात तब्बल 90 किलोमीटर पायी प्रवास करून जातात. म्हातोबा च मूळ ठाण असलेल्या बारपे तील डोंगरातून हे शेल तोडून आणलं जात. तिथे देवाची विधिवत पूजा आर्चा करून शेलेकरी हिंजवडीला दाखल होतात.हे शेले मिरवणूक रथावर चढवून त्यावर गळ टोचलेल्या जांभुळकर परिवारातील तरुणाला गोलाकार फिरवले जाते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा शेलेकरी देखील घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेला हा उत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे.

loading image
go to top