Coronavirus : मिळकतकरात सवलत; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव व संचारबंदी यामुळे नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने मिळकतकरामध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव व संचारबंदी यामुळे नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने मिळकतकरामध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशी असेल सवलत
- एक एप्रिल ते 31मे पर्यंत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची शंभर टक्के रक्कम एकरकमी भरल्यास भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या कराच्या विलंब दंड रकमेत 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

- एक एप्रिल 2020 ते 31मार्च 2021 अखेर सन 2020-21 च्या चालू मिळकतकरावर शास्ती शुल्क (महापालिका शास्ती कर ) पूर्ण माफ करणेत येईल.

- एक एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या कालावधीत मिळकत कर भरणाऱ्या मिळकतकरधारकांना 2019-2020 मधील कर व करेत्तर बाबींचे दरपत्रकामध्ये नमूद सामान्य करातील सवलत योजनेनुसार लागू राहील. 

- माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी, फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकती, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग (अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर) व्यक्ती यांच्या नावावर असणा-या मिळकती. संरक्षण दलातील शौर्यपदक धारक, माजी सैनिकांच्या विधवा, अविवाहीत शहीद सैनिकांच्या नामनिर्देशितांच्या मालमत्तांना मागील वर्षी सवलतींचा लाभ दिला आहे. त्यांच्याकडून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर प्राप्त होणा-या अर्जाच्या अधीन राहून चालू वर्षाकरिता संगणक प्रणालीमध्ये सवलतीचा फ्लॅग जनरेट करुन सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

कर वाढ करू नये - महापौर
महापालिकेचने २०२०-२१ करीता करवाढ करू नये. तसेच, लॉकडाऊन कालावधीमध्ये विभागीय कार्यालयाकडील कॅश काऊंटर 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवावे. मिळकतधारकांनी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरुन मिळकतकराचा ऑनलाईन भरणा करण्याच्या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income tax exemption; Decision of Pimpri Chinchwad Municipal Corporation