Coronavirus : मजुर कुटंबासह निघाले आपल्या मूळ गावी पायी चालत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रातील मजुरांना सह, सर्वच क्षेत्रातील मजूर वर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून अनेक कामगारांना पुढे काय होणार हा प्रश्न सतावत असुन, घराची खूप ओढ लागल्यामुळे अनेक मजूर हे हतबल होऊन चालत आपल्या मूळ गावी निघाले आहेत. काही मजुरांना तर त्यांच्या मालकांनी खोल्या खाली करायला सांगत अक्षरशः हाकलवून दिल्याने गावी जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही.

बालेवाडी - कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रातील मजुरांना सह, सर्वच क्षेत्रातील मजूर वर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून अनेक कामगारांना पुढे काय होणार हा प्रश्न सतावत असुन, घराची खूप ओढ लागल्यामुळे अनेक मजूर हे हतबल होऊन चालत आपल्या मूळ गावी निघाले आहेत. काही मजुरांना तर त्यांच्या मालकांनी खोल्या खाली करायला सांगत अक्षरशः हाकलवून दिल्याने गावी जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई बांद्रा येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे राहत असलेल्या मजुरांना बांधकाम व्यावसायिकाने हाकलून दिल्यामुळे हे मजूर आपल्या मूळ गावी म्हणजे कर्नाटकला पायी चालत निघाले आहे. यामध्ये दोन कुटुंबांचा समावेश असून यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी ते मुंबईतून पायी निघाले असून बरोबर रस्त्यामध्ये खायला लागणारी शिदोरी फक्त बरोबर घेतलेली आहे. तीच पुरवून खात आहेत. सगळीकडे बंद असल्यामुळे रस्त्यात कुठेही त्यांना खाण्यास मिळत नाही, तसेच कोरोना च्या भीती मुळे कोणीही वाहनचालक त्यांना बरोबर घ्यायला तयार नाहीत. कुटुंब ही पायी चालत आपल्या घरी गावी निघाल्याचे चित्र बालेवाडी जवळील मुंबई - बंगलुर महामार्गावर पाहायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The laborers left with the family walking on foot to their hometown